किर्तनकार इंदुरीकर महाराज उद्या प्रथमच सावंतवाडीत…

672
2
Google search engine
Google search engine

स्वामी मठाचा कलशारोहण सोहळा; उपस्थित रहा विशाल परबांचे आवाहन…

सावंतवाडी,ता.२७: भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या संकल्पनेतून चराठा येथे त्यांच्या निवासस्थान परिसरात उभारण्यात आलेल्या स्वामी समर्थ मठाचा कलशारोहण समारंभ उद्या ता २८ ला होत आहे. या पार्श्वभूमीवर किर्तनकार इंदुरीकर महाराज प्रथमच सावंतवाडीत येत आहेत. त्यांच्या किर्तनाचा कार्यक्रम सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

आजपासून या कलशारोहण सोहळ्याला सुरुवात झाली. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या सकाळी ११ वाजता ब्राह्मणांच्या उपस्थितीत आणि मंत्रोपचारांच्या जयघोषणा कलशारोहण सोहळा होणार आहे. तर सायंकाळी ६ वाजता इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि यावेळी उपस्थिती रहावे असे आवाहन श्री. विशाल परब यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.