पंचम खेमराज महाविद्यालयात प्रथम वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू….

103
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२८: येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे प्रथम वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. कला शाखेमध्ये इंग्रजी, मराठी, हिंदी, भुगोल, अर्थशास्त्र, मानसशास्त्र या विषयांमध्ये पदवी अभ्यासक्रम उपलब्ध आहे. वाणिज्य विभागामध्ये बीकाॅम पदवी अभ्यासक्रमा बरोबरच बि.काॅम बँकींग इन्श्युरन्स हा अभ्यासक्रम तर विज्ञान विभागामध्ये रसायनशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, भौतिकशास्त्र व गणित हे विषय उपलब्ध आहेत. त्याचबरोबर बी.एस्सी संगणकशास्त्र व बीएस्सी माहिती तंत्रज्ञान हे विषयही उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा व प्रवेश घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी.एल भारमल यांनी केले आहे.