“तर”…! वीज वाहिन्या अंडरग्राउंड करण्याचे काम निश्चितच झाले असते…

127
2
Google search engine
Google search engine

बबन साळगावकरांचा पलटवार; त्यामागे मला बदनाम करण्याचा केसरकरांचा डाव…

सावंतवाडी,ता.३०: वीज वाहिन्या अंडरग्राउंड करण्यासाठी निधी दिला परंतु, त्यानंतर रस्ते पुन्हा स्थितीत करण्यासाठी केसरकरांनी निधी देण्यास वेळ काढू भूमिका घेतल्यामुळे हा निधी परत गेला, तसेच काम केले असते तर संपुर्ण शहर खड्डेमय झाले असते. मात्र ते दुरुस्त करण्यासाठी पालिकेकडे निधी नव्हता. त्यामागे मला बदनाम करण्याचा त्यांचा डाव होता, असा आरोप सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषद केला.

दरम्यान मीच नव्हे तर, तत्कालीन नगराध्यक्ष श्वेता शिरोडकर यांच्या काळात भुयारी गटार योजनेसाठी ३६ कोटी रुपयांचा निधी आला होता, परंतु ती योजना सुद्धा त्यांनी यशस्वी होऊ दिली नाही, असे साळगावकर म्हणाले. काही दिवसांपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत, जे आज विरोध करतात त्यांच्यामुळेच सावंतवाडीच्या वीजवाहिन्या अंडरग्राउंड करण्याची योजना होऊ शकली नाही. निधी परत गेला, असा आरोप श्री. केसरकर यांनी साळगावकर यांच्यावर नाव न घेता केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी श्री. साळगावकर यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी केसरकर यांच्यावर जोरदार प्रत्यारोप केले.