टोक्यांनी केले नेरूर गोंधयाळवाडी येथील ग्रामस्थ “हैराण”..

126
2
Google search engine
Google search engine

गोदाम अधिकाऱ्यांच्या विरोधात नाराजी; तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी…

कुडाळ,ता.३०: धान्यात असलेल्या टोके नावाच्या कीटकामुळे नेरूर गोंधयाळवाडी येथील ग्रामस्थ हैराण झाले आहे. घरात जेवणात कपड्यात कीटक आढळत असल्याचा त्यांचा आरोप आहे. परिसरात असलेल्या गोदामात अतिरिक्त धान्यसाठा ठेवल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. त्यांचा तात्काळ याबाबत त्या कीटकांचा बंदोबस्त झाला नाही तर तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा त्यांनी दिला महामंडळाच्या गोदाम अधिकारी समृद्धी नांदगावकर यांना दिला आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार महामंडळाच्या गोदामात धान्य साठा करण्यात आल्यामुळे हे कीटक मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांना त्रास होत आहे. हे कीटक गेले महिनाभर घरभर मिळत असल्यामुळे त्याचा त्रास होतो. चावल्यानंतर जखम होते. त्यामुळे याबाबत योग्य ती भूमिका घ्यावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.
दरम्यान शिवसेनेने देखील या विषयामध्ये ग्रामस्थांच्या बाजूने राहण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचे जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितले. ही समस्या जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत येथील एकही धान्याची गाडी येऊ किंवा जाऊ देणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
यावेळी अजित मार्गी,ग्रा.प.सदस्य गणेश गावडे, मंगेश राऊत, राजेश सडवेलकर, किशोर सामंत, लक्ष्मण लोके, परेश जावकर, रामा कांबळी, सुंदरी शेगले, दिनेश कर्लीकर, कुणाल गावडे, अनिल गावडे, चंद्रकांत गावडे, शिल्पा गावडे, गौरी गवाणकर, प्रांजल गावडे, सीमा चिपकर, माधुरी जावकर, शारदा गावडे, प्रियांका कलिंगण, योगश सामंत, सुमन चिपकर, कविता गावडे, आपा धोंड, आदिसह नेरुर गोंधयाळेतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.