जिल्हास्तरीय फुटबॉल निवड चाचणीत २१ जणांची निवड…

272
2
Google search engine
Google search engine

संदीप गावडेंचा पुढाकार; एफ.सी सावंतवाडी संघात खेळण्याची संधी…

सावंतवाडी,ता.३१: भाजपचे युवा नेते संदीप गावडे यांच्या माध्यमातून सावंतवाडीत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय फुटबॉल निवड चाचणीत २१ जणांची निवड करण्यात आली. यात २ संघ निवडण्यात आले असून त्यांना एफ.सी सावंतवाडी संघात खेळण्याची संधी दिली जाणार आहे. तसेच शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.

या शिबिरात तब्बल ४० जणांनी सहभाग घेतला होता. श्री. गावडे यांच्या माध्यमातुन सावंतवाडी जिमखाना मैदान येथे मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिर आणि फुटबॉल निवड चाचणी घेण्यात आली होती. या शिबिराला खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हाभरातून या शिबिराचा खेळाडूंनी लाभ घेतला. प्रशिक्षक गिल्बर्ड डीकोस्टा व एलपीलो पिंटो यांनी खेळाडू घडविण्यासाठी विशेष मेहनत घेतली. श्री. गावडे यांनी उचललेल्या पाऊलामुळे जिल्ह्यातील खेळाडू घडतील अशी प्रतिक्रिया शहरातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.