युवराज लखमराजे भोंसले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा…

215
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०२: येथील संस्थानचे युवराज तथा भाजप प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष लखमराजे भोंसले यांचा वाढदिवस आज येथील राजवाडा परिसरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राजघराण्यातील व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी लखमराजेंच्या भविष्यातील उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी राजे खेमसावंत भोंसले, राणी शुभदादेवी भोंसले, युवराज्ञी श्रद्धा भोंसले, सामाजिक कार्यकर्ते अँड. नकुल पार्सेकर, एसपीके कॉलेजचे प्राचार्य डॉ. दिलीप भारमल, एल. एम. सावंत, मोरेश्वर पोतनीस, सोमेश्वर सावंत, सचिन सावंत आदींसह प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.