देशभक्त गवाणकर महाविद्यालयाचा बीएमएसचा ९२ टक्के निकाल…

397
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.०५: लोकमान्य ट्रस्ट संचलित देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयाचा तृतीय वर्षाचा बीएमएसचा ९२ टक्के निकाल लागला आहे. यात शारदा प्रमोद नाईक प्रथम, लज्जीता दिलीप भालेकर द्वितीय तर स्वराली सदाशिव पेडणेकर हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
त्यांना प्रा. आनंद नाईक, अस्मिता गवस, साईप्रसाद पंडित , शैलेश गावडे, मेधा मयेकर , एल पी . पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, सचिव पंढरी परब, संचालक सई ठाकूर बिजलानी, संचालक सचिन मांजरेकर, लोकमान्य एज्युकेशनचे कोऑर्डिनेटर श्री. मिसाळे, सीनियर एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभू केळुसकर, कॉलेजचे प्राचार्य यशोधन गवस यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.