कणकवली-कुडाळ मधून आलेल्या पर्यटकांना सावंतवाडी विधानसभेत थारा नाही…

1115
2
Google search engine
Google search engine

संजू परब; केसरकर व आपण एकत्र असताना मतदान कमी याचे शल्य, आत्मचिंतन करणार…

सावंतवाडी,ता.०५: माझ्या वरिष्ठ नेत्यांनी आमदारकीसाठी कामाला लाग, अशा मला सुचना दिल्या आहेत. त्यामुळे काही झाले तरी मीच विधानसभा लढविणार आहे. स्थानिक उमेदवार म्हणून मीच चालणार आहे. त्यामुळे कणकवली-कुडाळ मधून सावंतवाडीत येणार्‍या पर्यटकांना थारा मिळणार नाही, असा टोला माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी आज येथे राजन तेली, विशाल परब यांचे नाव न घेता टोला लगावला. दरम्यान सावंतवाडी मतदार संघात मंत्री केसरकर व आपण एकत्र असताना मतदान कमी झाले हे माझ्यासाठी “चॅलेंजीग” आहे. त्यामुळे याचे आत्मचिंतन नक्कीच करणार आहे, असे ही ते म्हणाले.
श्री. परब यांनी आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेवून राणेंना निवडणून देणार्‍या मतदारांचे आभार मानले. तसेच या ठिकाणी अल्पसंख्याक मतदार आमच्या सोबत राहिले नसल्यामुळे आमच्या मतात घट झाली याची प्रांजळ कबूली दिली तसेच आपण आणि केसरकर एकत्र असताना मतदान का घटले याबाबत आपण आत्मचिंतन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ते पुढे म्हणाले, या ठिकाणी राणे आता निवडून आल्यामुळे केद्रांत मंत्री होणार आहेत. त्यामुळे नक्कीच कोकणाचा विकास होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांसह मतदारात आनंदाचे वातावरण आहे. आता येणार्‍या काळात मतदारांनी केलेल्या मागण्या पुर्ण करण्यासाठी पाठपुरावाला केला जाणार आहे. आठवड्याभरापुर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत राजन तेली यांनी परब यांच्यावर नाव घेता टिका केली होती. याला श्री. परब यांनी प्रत्यूत्तर दिले आहे. ते म्हणाले, आगामी विधानसभेत आमदारकी लढव असे माझ्या पक्ष नेतृत्वाने मला सांगितले आहे. त्यामुळे आता मी आमदारकी लढणार आहे. मात्र या ठिकाणी कणकवली, कुडाळ, मुंबई आणि पुणे येथून आलेले पर्यटक येथील जनता स्वीकारणार नाही, असा टोला त्यांनी राजन तेली, विशाल परब, अर्चना घारे आणि शैलेश परब यांचे नाव न घेता लगावला.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती संदिप तळवणेकर, तळवणे सरपंच गोविंद केरकर उपस्थित होते.