निमजगा येथील बांध लोकसहभागातून उघडला…

119
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.०७: निमजगा येथे घालण्यात आलेला लोखंडी प्लेटचा बांध पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर यांच्या पुढाकाराने लोकसहभागातून उघडण्यात आला. तसेच बंधाऱ्यात साठलेला कचरा व गाळ काढून परिसराची स्वच्छता करण्यात आली.

यावेळी हेमंत दाभोलकर, ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी मोहन सावंत, अजय आईर, अवधूत मेस्त्री आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

दरम्यान लोखंडी प्लेटचा बांध घालण्यासाठी तेथील सामाजिक कार्यकर्ते गुरु कल्याणकर व हेमंत दाभोळकर यांनी लघुपाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्याच्या मागणीला यश मिळाल्याने बंधाऱ्यात पाण्याची साठवणूक होऊन निमजगा, गवळीटेंब, शेटकरवाडी, गणेश नगर या भागातील विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली व तेथील सार्वजनिक नळ धारकांना मुबलक पाणीपुरवठा झाला. त्यामुळे तेथील ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.