आडाळीत “कासाब्लांका” हे अत्तराची इंटरनॅशनल कंपनी, जागा ताब्यात घेतली…

398
2
Google search engine
Google search engine

राजन तेली; लोकसभेबाबत नक्कीच आत्मपरीक्षण, आता आरोग्य व रोजगारासाठी पाठपुरावा करणार…

सावंतवाडी,ता.०८: आडाळी येथे “कासाब्लांका” या इंटरनॅशनल कंपनीने अत्तर बनविण्याच्या कारखान्यासाठी जागा ताब्यात घेतली आहे. या कंपनीच्या माध्यमातून येथील अडीचशेहून अधिक युवकांना नोकऱ्या मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित युवकांना आवश्यक असलेले ट्रेनिंग देण्यात येणार आहे तसेच लवकरात-लवकर ही कंपनी सुरू होण्यासाठी पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार तथा भाजपा नेते राजन तेली यांनी दिली.

दरम्यान आगामी काळात आपण जिल्ह्यातील रोजगार आणि आरोग्य या विषयावर काम करणार आहोत. लोकसभा निवडणूकीत नेमकी मते कमी कशी मिळाली? याचे आत्मचिंतन केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. श्री. तेली यांनी आज आपल्या कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीत मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले तसेच भविष्यात राणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील बीएसएनएल आणि जीओ टॉवरची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री तथा बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्ह्याला कोट्यावधी रुपयाचा निधी देवून सुध्दा या ठिकाणी विकास कामे अर्धवट झाली आहेत, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अधिकाऱ्यांचा लक्ष नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असून याबाबत आपण लवकरच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री व नारायण राणे यांची भेट घेवून लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकसभा निवडणूकीत झालेल्या मतदानाबाबत त्यांना विचारले असता. ते म्हणाले, या ठिकाणी आम्हाला अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले. ही वस्तुस्थिती आहे. याबाबत नक्कीच सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेवून आत्मपरिक्षण करण्यात येणार आहे. कुठे, काय चुकले? याचा अभ्यास होणार असून येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर रोजगार आणि आरोग्य या २ प्रश्नांकडे विशेष लक्ष देवून काम केले जाणार आहे, असे ते म्हणाले.