सिंधुदुर्गात उद्या “रेड अलर्ट”… 

2254
2
Google search engine
Google search engine

हवामान खात्याचा अंदाज; खबरदारी घेण्याचे आवाहन…

सावंतवाडी,ता.०८: सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्या विजेच्या गडगडाटास मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून “रेड अलर्ट” जाहीर करण्यात आला आहे. २ दिवसांपूर्वी जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. काही भाग वगळता अद्याप पर्यंत पावसाला म्हणावा तसा जोर नाही, आज पासून काही ठिकाणी रिमझिम पाऊस सुरू आहे, मात्र उद्या जिल्ह्यात मुसळधार व गडगडाटासह पाऊस पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.