भारत टॅलेंट सर्च परीक्षेत माडखोल-धवडकी शाळेचा धैर्य कोळमेकर राज्यात चौथा…

72
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१०: भारत टॅलेंट सर्च परीक्षेत आयएसओ मानांकित माडखोल धवडकी शाळा नं. २ च्या दुसरीतील विद्यार्थी कु. धैर्य दत्ताराम कोळमेकर याने ९२ गुणांसह राज्यात चौथा येण्याचा बहुमान मिळविला आहे.

तसेच या परीक्षेत या शाळेतील प्रांजल मुरकर ६८, रामभाऊ गावकर ६२ व आत्माराम देसाई याने ५२ गुण मिळवून यश संपादन केले आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका भावना गावडे, शिक्षक अरविंद सरनोबत, समीक्षा राऊळ, वैदेही सावंत, केशव जाधव, केंद्रप्रमुख रामचंद्र वालावलकर, शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.