जेईई, एनईईटीचे धडे देणारी “परफेक्ट अकॅडमी” आता सावंतवाडीत…

103
2
Google search engine
Google search engine

प्रवेश प्रक्रिया सुरू; कोटा येथील तज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून होणार मार्गदर्शन…

सावंतवाडी-: कुडाळ आणि पणजी येथे जेईई, एनईईटी, एमएचटी, सीईटीचे शिक्षण देणारी “परफेक्ट अकॅडमी”ची शाखा आता येथील आरपीडी हायस्कूलच्या प्रांगणात सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जेईई, एनईईटी, एमएचटी, सीईटी अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोटा येथील तज्ञ शिक्षक तसेच स्टेट बोर्डाच्या तयारीसाठी स्थानिक अनुभवी शिक्षक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

गेली ७ वर्षे या क्षेत्रात सेवा बजावणाऱ्या “परफेक्ट अकॅडमी” संस्थेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना घडवले आहे. यातील अधिक विद्यार्थ्यांचा आय.आय.टी, एन.आय.टी, व्ही.जे.टी.आय मध्ये प्रवेश झाला आहे. तसेच १५ हून अधिक विद्यार्थ्यांचा शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश झाला आहे. २०२४ च्या बारावी परीक्षेमध्ये १८ विद्यार्थ्यांनी ८० टक्के पेक्षा अधिक गुण घेऊन आपले चूणूक दाखवून दिली आहे.

या पार्श्वभूमीवर आता या शैक्षणिक वर्षासाठी संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी तात्काळ संपर्क साधून आपली जागा निश्चित करून घ्यावी, असे आवाहन परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून राजाराम परब यांनी केले आहे. दरम्यान अधिक माहितीसाठी

9325017458/ 9543139334 या नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.