पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा वेंगुर्ले भाजपकडून सन्मान…

69
2
Google search engine
Google search engine

नारायण राणेंच्या यशात महत्वाची भूभिका; कार्यकर्त्यांकडून कृतज्ञता व्यक्त…

वेंगुर्ले,ता.१२: खासदार नारायण राणे यांच्या विजयासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या पालकमंत्री तथा राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचा वेंगुर्ले भाजपकडून सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य तथा वेंगुर्ले नगरपरीषदेचे माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्षा श्र्वेता कोरगांवकर, पदवीधर निवडणूक जिल्हा संयोजक प्रमोद रावराणे, प्रदेश सदस्य शरद चव्हाण, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई आदी उपस्थित होते.

लोकसभेत महायुतीचे भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांच्या विजयासाठी वेंगुर्ले तालुक्याने प्रामाणिक काम करत साडेनऊ हजार मताधिक्य देत उत्कृष्ठ काम केल्याबद्दल उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांचे आभार मानले. यावेळी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी उपस्थित मान्यवरांत पदवीधर संयोजक प्रशांत खानोलकर, जिल्हा निमंत्रित साईप्रसाद नाईक, जि. उपाध्यक्ष अँड. सुषमा प्रभू-खानोलकर, जिल्हा चिटणीस निलेश सामंत, जि.का.का. सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल, सोमनाथ टोमके, तालुका सरचटणीस बाबली वायंगणकर, जयंत मोंडकर, महिला आघाडी अध्यक्षा सुजाता पडवळ, माजी नगराध्यक्ष प्रसन्ना उर्फ पपू कुबल, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, मठ सरपंच रूपाली नाईक, पेंडूर सरपंच संतोष गावडे, पाल सरपंच कावेरी गावडे, रेडी सरपंच रामसिंग राणे, अणसुर सरपंच सत्यविजय गावडे, रेडी जि.प. मतदार संघाचे माजी सदस्य प्रितेश राऊळ, म्हापण जि.प. मतदार संघाच्या माजी सदस्य वंदना किनळेकर, मच्छिमार सेलचे जिल्हा संघटक दादा केळूसकर, वेंगुर्ले तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, होडावडा उपसरपंच राजबा सावंत ,मठ उपसरपंच बंटी गावडे, सुजाता देसाई, श्रेया मयेकर, सुरेंद्र चव्हाण, अभि वेंगुर्लेकर , युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, बाळू प्रभू, रफिक शेख,लक्ष्मीकांत कर्पे , परबवाडा उपसरपंच विष्णू उर्फ पपू परब, श्रीकृष्ण ऊर्फ राजु परब , शिरोडा ग्रामपंचायत माजी सरपंच मनोज उगवेकर, शक्तिकेंद्र प्रमुख कमलेश गावडे, विजय बागकर, सुधीर गावडे, संतोष शेटकर, जगन्नाथ राणे, महादेव नाईक, तुषार साळगांवकर, अजित नाईक, विजय रेडकर, शरद मेस्त्री, भूषण आंगचेकर, भुषण सारंग, प्रमोद वेर्णेकर, संदिप देसाई आदी उपस्थित होते.