कोकण पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महायुतीचाच विजय…

224
2
Google search engine
Google search engine

रवींद्र चव्हाण; निरंजन डावखरेंना मोठे मताधिक्य मिळेल- निलेश राणे…

मालवण,ता.१२: लोकसभा निवडणुकीत कोकण प्रांतात जनतेने ठाकरे गटाला नाकारले. भाजपा महायुती उमेदवार विजयी झाले. आता लक्ष पदवीधर निवडणूक आहे. मोठ्या मताधिक्याने आमदार निरंजन डावखरे यांना विजयी करूया. विजय महायुतीचाच असेल. असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी येथे केले.

कोकण विभाग पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज तालुक्याची नियोजन बैठक दैवज्ञभवन येथे पार पडली. या बैठकीसाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्यासहित सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

मालवण- कुडाळची जनता एकदा ठरवले की काहीही करू शकते. हे लोकसभा निवडणुकीत राणेंना मोठे मताधिक्य देऊन दाखवून दिले आहे. आता विधानपरिषद निवडणुकीत येथील मतदार मोठे मताधिक्य आमदार निरंजन डावखरे यांना देतील. मोठ्या मताधिक्याने त्यांचा विजय होईल. असा विश्वास श्री. राणे यांनी व्यक्त केला. यावेळी अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, अशोक सावंत, विजय केनवडेकर, धोंडी चिंदरकर यांनीही विचार मांडले.