दशावतार हा खरा कोकणचा आत्मा, आपली संस्कृती…

289
2
Google search engine
Google search engine

विशाल परब; जिल्ह्यातील दशावतार मंडळांनी भेट घेत वेधले लक्ष…

सावंतवाडी,ता.१७: तळकोकणची ओळख असणारा दशावतार हा खरा कोकणचा आत्मा आहे. ही आपली संस्कृती आहे. ती जपली पाहिजे तसेच एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली पाहिजे, असे प्रतिपादन युवा नेते तथा भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी आज येथे केले.
जिल्ह्यातील दशावतार नाटक मंडळींनी श्री. परब यांची भेट घेत आपले विविध प्रश्न मांडले. तसेच ३० तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाचे देखील निमंत्रण देण्यात आले. दरम्यान येत्या काळात दशावतार मंडळांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न करू, विश्वास श्री. परब यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी अंकुश जाधव, सुभाष लोंढे, विलास गवस, कृष्णा नाईक, प्रभाकर गवस, प्रेमानंद ठाकूर, विश्वनाथ गवस, शंकर जाधव, उदय गवस, आदित्य गवस, अभिमन्यू बांदेकर, गुणाजी कदम, कृष्णा कुंभार, अजिंक्य गवस, देवेंद्र भैरवकर, नारायण गवस, राजन बांदेकर, मधुसूदन गवत आदी मान्यवर उपस्थित होते.