कणकवलीतील परेश मडव याचे सीईटी व जेईई परिक्षेत घवघवीत यश…

30
2
Google search engine
Google search engine

परफेक्ट अकॅडमीचे मार्गदर्शन; एनआयटी तसेच ट्रिपल आयटी काॅलेजसाठी संधी…

सावंतवाडी,ता.१७: परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून योग्य ते मार्गदर्शन मिळाल्यामुळे कणकवली येथील परेश मडव याने सीईटी व जेईई या प्रवेश परीक्षांमध्ये घवघवीत यश मिळवले आहे. परेश हा कणकवली कॉलेजचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील हे माजी सैनिक असून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून त्यांनी हे यश मिळवले आहे.
परेश हा दहावीपर्यंत मराठी माध्यमातून शिक्षण घेत होता. त्याने प्रवेश प्रक्रिया परीक्षेत ९८.५ टक्के गुण मिळवले होते. या काळात परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून त्याला मोलाचे सहकार्य मिळाले. परेश हा काॅम्प्युटर सायन्स इंजीनियरिंग मध्ये आपले करिअर करण्यास इच्छूक आहे. सद्यस्थिती त्याला एनआयटी तसेच ट्रिपल आयटी यासारख्या देशपातळीवरील मोठमोठे कॉलेजमधून प्रवेशाची संधी उपलब्ध आहे. त्याच्या या यशाबद्दल परफेक्ट अकॅडमीच्या माध्यमातून संस्थेच्या वतीने प्रा. राजाराम परब व अन्य सर्व शिक्षकांनी त्याला शुभेच्छा दिल्या.