भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार…

342
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१९: येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या दहावीत ए-वन श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या आर्यन हिर्लेकर, ऋतुजा गावडे, ऋषी लेले, तन्मय कुमार, शौनक नर, स्वरांगी आंगचेकर, विराज सावंत, जान्हवी देसाई या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी तसेच पालक उपस्थित होते.
या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, अध्यक्षा अस्मिता सावंत-भोसले, प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.