सावंतवाडी तहसिलदार कार्यालयाचे प्रवेशव्दार धोकादायक…

233
2
Google search engine
Google search engine

अपघाताची शक्यता; तात्काळ बदला, माजी नगरसेवक सुरेश भोगटेंची मागणी…

सावंतवाडी,ता.१९: येथिल तहसिलदार कार्यालयाचे प्रवेशव्दार धोकादायक बनले आहे. पावसाळ्यात ते कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे ते तात्काळ बदलण्यात यावे, अशी मागणी आज येथिल माजी नगसेवक सुरेश भोगटे यांनी अप्पर तहसिलदार मोनिका कांबळे यांच्याकडे केली.

दरम्यान जीर्ण झालेले ते प्रवेशव्दार बदलण्यात यावे अन्यथा ते काढून टाकण्यात यावे, अशी मागणी आम्ही यापुर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे तहसिलदार श्रीधर पाटील यांचे म्हणणे आहे. या प्रवेशव्दाराचा खालील भाग अतिशय जीर्ण झाला आहे. त्यामुळे ते प्रवेशव्दार कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार लक्षात आल्यानतर श्री. भोगटे यांनी आपले सहकारी माजी नगरसेवक देवा टेमकर, महेश नार्वेकर शशिकांत परब, चद्रकांत जाधव, सुंदर गावडे यांच्या उपस्थितीत अप्पर तहसिलदार कांबळे यांची भेट घेतली आणि या प्रवेशव्दाराबाबत योग्य ती भूमिका घ्या अशी मागणी केली.