शेतकऱ्यांचे नुकसान रोखण्यासाठी १ रुपयात विमा योजना…

114
2
Google search engine
Google search engine

जिल्ह्यातील जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्या; कृषी अधीक्षकांचे आवाहन….

ओरोस,ता.१९: नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान वाचविण्यासाठी कृषी विभागाच्या माध्यमातून १ रुपयात विमा ही पंतप्रधान पिक विमा योजना राबविली जात आहे. याचा फायदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांनी केले आहे.
या विमा योजनेंतर्गत अंतर्गत भात, नाचणी या पिकांकरिता तसेच पेरणी न होणे, पूर, दुष्काळ नुकसान वीज कोसळणे यासारख्या आपत्ती मुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानाची भरपाई मिळणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. राऊत यांनी केले आहे.