माडखोलच्या व्ही. पी. कॉलेजमध्ये डी. फार्म, बी. फार्म साठी प्रवेश सुरू…

83
2
Google search engine
Google search engine

यावर्षीपासून आय. टी. आय; जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन…

सावंतवाडी,ता.१९: माडखोल येथील व्ही. पी. कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात डी. फार्म, बी. फार्म, एम. फार्म या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या महाविद्यालयाच्या माध्यमातून यावर्षीपासून आय. टी. आय संस्था सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

गेली अनेक वर्षे विश्वासार्ह फार्मसीचे शिक्षण देणाऱ्या व्ही. पी. कॉलेजच्या माध्यमातून या वर्षीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे‌. यात डी. फार्म, बी. फार्म, एम. फार्म या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. तर शनेश्वर खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था या नावाने आय. टी. आय सुरू करण्यात आले असून यात इलेक्ट्रिशियन आणि वायरमन हे दोन वर्षाचे कोर्स तर ह्युमन रिसोर्सेस एक्झिक्यूटिव्ह आणि जी. ई. ओ इन्फॉर्मेटिक्स असिस्टंट हे एक वर्षाचे कोर्सेस सुरू करण्यात आले आहेत.

महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुभवी व तज्ञ प्राध्यापकांकडून शिकवले जाणार आहे. तसेच अद्ययावत व सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय उपलब्ध करून दिले जाणार आहे. अत्याधुनिक संगणक कक्ष व इंटरनेटची सुविधा आहे. माफक शैक्षणिक शुल्क तसेच शिष्यवृत्तीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे या महाविद्यालयात प्रवेश करून विद्यार्थ्यांनी आपले भविष्य उज्वल करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी ९७६३८२४२४५ / ९४२०१९६०३१ या नंबरशी संपर्क साधावा.