ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत किर्लोस येथील कृषीकन्या निरवडेत…

132
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१९: डॉ .बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्‌यालय किर्लोस ओरोस येथे शिक्षण घेत असलेल्या कृषीकन्या सावंतवाडी तालुक्यातील निरवडे गावात दाखल झाल्या आहेत.यावेळी निरवडे गावच्या सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर व इतर  कर्मचाऱ्यांनी मिळून कृषीकन्यांचे स्वागत केले. महाविदयालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद ओगले, प्रा. महेश परुळेकर प्रा. गोपाल गायकी, प्रा. भावना पाताडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेहा इंगुळकर, वैष्णवी जाधव, वैष्णवी सरखोत, लेक्ष्मी क्रीष्णा अनघा अशोकन, या कृषीकन्या ग्रामीण कृषी कार्यानुभव या शैक्षणिक अभ्यासक्रमाअंतर्गत निरवडे येथील शेतक-यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या प्रसंगी निरवडे गावच्या सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, तलाठी नमिता कुरतडकर, कृषी सहाय्यिका सावंत मॅडम, माजी सरपंच प्रमोद गावडे, ग्रामपंचायत सदस्य धर्माजी गावडे लिपिक मुक्ता तोरसकर, लिपिक संजय शेटकर, शिपाई भरत माणगावकर,  ग्रामपंचायत कर्मचारी विलास गावडे,ग्रामस्थ बाबुराव सावंत यांनी कृषी कन्यांचे स्वागत केले.कृषी शिक्षणाच्या माध्यमातून या कृषी कन्या येथील शेतक-यांच्या सहयोगाने शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, शेतक-यांना सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, चारा पिके.. पारंपारिक नैसर्गिक शेतीचा अभ्यास करणे, वृक्ष लागवड करणे, कृषी विषयक कार्यशाळा घेणे असे विविध उपक्रम राबवणार आहेत.