शेर्ले केंद्र शाळेत अरुण धुरी यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वाटप…

235
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.१९: शेर्ले येथील केंद्र शाळेत अरुण धुरी व लक्ष्मी धुरी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. धुरी कुटुंबीय गेली ८ वर्षे सातत्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य पुरवतात. शैक्षणिक वर्ष सुरू होत असताना अरुण धुरी यांनी सर्व पालकांच्या उपस्थितीत पहिली ते पाचवीच्या एकूण ७२ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य दिले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल जाधव, उपाध्यक्षा साईशा पराष्टेकर, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत कराड, सदस्या करुणा धुरी, हुसेन शेख, सर्व पालक, विद्यार्थी व सर्व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक बाबाजी झेंडे यांनी केले.