डावखरे यांनी ३६ कोटींच्या निधीचा हिशेब द्यावा…

144
2
Google search engine
Google search engine

नागेश निमकर ;  पैसे वाटून निवडणूक जिंकण्याचा फंडा…

कणकवली, ता.१९ : कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपचे निरंजन डावखरे हे गेली बारा वर्षे प्रतिनिधीत्‍व करत आहेत. प्रत्‍येक वर्षाला ३ कोटी या प्रमाणे त्‍यांना ३६ कोटींचा निधी मिळाला. या निधीतून कोणती विकास कामे त्‍यांनी केली असा सवाल नागेश निमकर यांनी आज केला.

कोकण पदवीधर मतदार संघातील अपक्ष उमेदवार नागेश किसनराव निमकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली. त्‍यांच्यासोबत प्रा.अशिष नाईक उपस्थित होते.

श्री.निमकर म्‍हणाले, ठाणे, पालघर आणि रायगड मध्ये पदवीधर मतदार तयार करायचे, त्‍यांना पैसे वाटायचे आणि निवडून यायचे असाच फंडा भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे वापरत आहेत. गेली बारा वर्षे ते विधान परिषदेत आहेत. पण पदवीधरांचा एकही प्रश्‍न ते सोडवू शकलेले नाहीत. एवढेच नव्हे तर दरवर्षी मिळणारा ३ कोटींचा आमदार निधीही खर्च करू शकलेले नाहीत.

ते म्‍हणाले, डावखरे यांच्या प्रचारासाठी भाजपचे तब्‍बल साडे सात हजार कार्यकर्ते काम करत आहेत. पण कोकणातील सुज्ञ मतदार यंदा डावखरे यांना निवडून देणार नाहीत. कोकणात पदवीधरांचे अनेक प्रश्‍न आहेत. पण राजकीय लोकप्रतिनिधी हे प्रश्‍न विधान परिषदेत मांडून सोडवू शकत नाहीत. त्‍यांना फक्‍त आमदार होण्यातच मतलब अाहे. त्‍यामुळेच आपण अपक्ष म्‍हणून रिंगणात उतरलो आहोत.

पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे रमेश किर देखील रिंगणात आहेत. पण ते आता वयोवृद्ध झाले आहेत. विधान परिषदेत पदवीधरांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी तरूण उमेदवारच हवा असेही नागेश निमकर म्‍हणाले.