जळीतग्रस्त तोडणकर कुटूंबास उपसरपंच सदस्याकडून आर्थिक मदत..

355
2
Google search engine
Google search engine

मालवण, ता. १९ : वायरी भुतनाथ मोरेश्वरवाडी येथील जळीतग्रस्त विक्रम तोडणकर कुटुंबास वायरी भूतनाथ उपसरपंच प्राची माणगावकर, ग्रामपंचायत सदस्या ममता तळगावकर यांनी आर्थिक मदत सुपूर्द केली.

काही दिवसांपूर्वी विक्रम तोडणकर यांच्या राहत्या घरास शॉर्टसर्किटने आग लागली. यात संपूर्ण घर जळून खाक झाले. त्यामुळे तोडणकर कुटुंब उघड्यावर पडले. त्यामुळे त्यांच्या निवाऱ्याची सोया व्हावी यासाठी विविध सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला. त्यात उपसरपंच प्राची माणगावकर, ममता तळगावकर यांनी आर्थिक मदत तोडणकर कुटूंबाला सुपूर्द केली.