न्यूमोनियामुळे सावंतवाडी पालिकेच्या महिला कर अधिकार्‍याचे निधन…

2098
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.१९: येथील पालिकेच्या कर निधारण अधिकारी रचना कोरगावकर यांचा आज न्यूमोनियाने मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. त्या काल पासून अत्यवस्थ झाल्या होत्या. त्यामुळे त्यांना कुडाळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्या ठिकाणी त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना अधिक उपचारासाठी बेळगाव केईएम येथे हलविण्याचा सल्ला देण्यात आला होता. त्यानुसार त्यांना बेळगाव येथे नेत असताना माडखोल बुर्डी पुल परिसरात त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी त्यांच्या समवेत असलेल्या सहकार्‍यांना संशय आल्यामुळे त्यांनी सावंतवाडीतील एका खासगी रुग्णालयात त्यांना आणले. परंतू त्यांचा मृत्यू झाला, असे तेथील डॉक्टरांनी सांगितले. कोरगावकर या काही महिन्यापुर्वी सावंतवाडी पालिकेत कर निर्धारण अधिकारी म्हणून काम करीत होत्या. त्या मनमिळावू होत्या. त्यामुळे त्यांच्या अचानक जाण्यामुळे पालिका कर्मचार्‍यात हळहळ व्यक्त करण्यात आली.