चोरीस गेलेल्‍या दुचाकीचा दोन तासांत शोध…

417
2
Google search engine
Google search engine

कणकवली पोलिसांचा तपास : चोरट्याचा शोध सुरू….

कणकवली, ता.१९ : कासार्डे जांभळगाव येथील बंद घरातून चोरीस गेलेली दुचाकी कणकवली पोलिसांनी श्‍वानपथकाच्या सहाय्याने दोन तासात शोधली. तर दुचाकी चोरट्याचा शोध पोलीस घेत आहेत.
कासार्डे जांभळगाव येथे संजना संजय तळगावकर (वय ६२) यांचा तळमजल्‍यावर फ्लॅट आहे. तळगावकर कुटुंबीय ठाणे येथे राहतात. २ मे रोजी तळगावकर हे फ्लॅट बंद करून ठाणे येथे गेले होते. आज (ता.१९) दुपारी ते कासार्डे जांभळगाव येथे आले असता घराच्या दरवाजाचे कुलूप गायब असून फक्‍त कडी लावून दरवाजा बंद केल्‍याचे दिसून अाले. घरात गेल्‍यानंतर आतील कपाट उघडून सर्व सामान विस्कटलेले होते. तसेच घरात उभी केलेली दुचाकीही नसल्‍याची बाब निदर्शनास आली. यानंतर संजना तळगावकर यांनी दुपारी सव्वा दोन वाजता कणकवली पोलीस ठाण्यात येऊन दुचाकी (एमएच ०५ एम ६४३१) चोरीस गेल्‍याची तकार दिली.
तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक समशेर तडवी, उपनिरीक्षक अनिल हाडळ, हवालदार विनोद चव्हाण, पोलीस भूषण सुतार, किरण कदम यांनी श्र्वानपथकासह कासार्डे येथे जाऊन पाहणी केली. श्र्वानपथकाच्या साहाय्याने सायंकाळी चारच्या सुमारास चोरीस गेलेल्‍या घरापासून दीड किलोमिटर अंतरावर कासार्डे ब्राम्‍हणवाडी बस थांबा येथे दुचाकी अाढळून आली. ही दुचाकी कणकवली पोलिसांनी ताब्‍यात घेतली असून दुचाकी चोरट्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ करत आहेत.