मातृत्त्व आधार फाउंडेशनचा जळीतग्रस्त तोडणकर कुटुंबास आधार…

219
2
Google search engine
Google search engine

 

मालवण, ता. १९ : येथील मातृत्व आधार फाऊंडेशन या सामाजिक संस्थेने वायरी मोरेश्वर वाडी येथील जळीतग्रस्त विक्रम गोपाळ तोडणकर यांच्या घरी भेट देत जमा झालेली ११ हजार १०० रुपयांची आर्थिक मदत गिरीजा तोडणकर यांच्याकडे सुपूर्द केली.
काही दिवसापूर्वी या तोडणकर कुटुंबाला दुहेरी संकटाला सामोरे जावे लागले होते. तळाशील होडी दुर्घटनेतील बेपत्ता किशोर चोडणेकर हे विक्रमचे सख्खे भावोजी आहेत. अशा परिस्थितीत विक्रम तोडणकर यांच्या घराला शॉर्टसर्किट मुळे आग लागून संपूर्ण घर बेचिराख झाले होते. यात नेहमी सामाजिक बांधिलकी जपणारी मातृत्व आधार यांनी आपल्या सर्व परिवाराला मदतीसाठी आवाहन केले होते. या आवाहनाला उत्तम प्रतिसाद लाभला. यात तातडीची मदत म्हणून आज ११ हजार १०० रुपयांची मदत विक्रमची आई गिरिजा तोडणकर हिच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी मातृत्वचे संस्थापकीय अध्यक्ष संतोष लुडबे, दादा वेंगुर्लेकर, फॅनी फर्नांडिस, मार्शल फर्नांडिस, निशाकांत तोडणकर, उन्नती तोडणकर, नेहा तोडणकर, सचिन आडकर हे उपस्थित होते. यासाठी मदत केलेल्या सर्वांचे संतोष लुडबे यांनी आभार मानले.