सावंतवाडीच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात प्रवेश प्रक्रिया सुरू…

57
2
Google search engine
Google search engine

नामांकित पदवी शिक्षण कोर्सेस उपलब्ध; मर्यादित जागा, प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन…

सावंतवाडी,ता.१९: जिल्ह्यातील “ए” श्रेणी प्राप्त अभ्यासक्रम व दूर शिक्षणात अग्रेसर असलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये पदवी शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिक्षणाबरोबरच आर्थिक दृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी चालून आली आहे.

येथील आरपीडी जुनियर कॉलेज स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये बी. ए, बी. कॉम, एम. कॉम, एम. ए ( मराठी ), एम. ए ( हिंदी ), एम. ए ( अर्थशास्त्र ), एम. ए ( लोकशास्त्र ), एम. ए ( इतिहास ) एम. बी. ए ( HR, FIN, MKT ), रुग्ण सहाय्यक ( पेशंट असिस्टंट ), गांधी विचार दर्शन पदविका इत्यादी पदवी शिक्षण कोर्सेस उपलब्ध आहेत. तसेच टेक्निकल व इतर विद्यापीठ कोर्सेस विषय मार्गदर्शन उपलब्ध करण्यात येते. दहावी किंवा बारावी उत्तीर्ण, पदवीधर, व्यावसायिक, नोकरदार व महिलांसाठी शिक्षणातील सर्वोच्च संधी विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच एम. पी. एस. सी, यू. पी. एस. सी अशा स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त व सक्षम शिक्षण उपलब्ध करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कल लक्षात घेऊन नवनवीन शिक्षणक्रम जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचा अभ्यासकेंद्राचा मानस आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८६०५९९२३३४/ ९४२२८९६६९९ या नंबरशी संपर्क साधा.