उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या टिसिंचा कोकण रेल्वेकडून सन्मान…

200
2
Google search engine
Google search engine

रत्नागिरी,ता.२०: कोकण रेल्वेत गेल्या वर्षभरात सर्वोत्तम कामगिरी व अवैध प्रवास रोखणाऱ्या तिकीट तपासनीसांचा कोकण रेल्वेच्या वतीने सन्मान करण्यात आला. या आर्थिक वर्षात त्यांनी तब्बल २१ कोटी १७ लाख ८० हजार ७४१ रुपयांचा दंड वसूल केला आहे.
गेले काही दिवस कोकण रेल्वेच्या मार्गावर अवैध आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्या मंडळी विरोधात विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती. या अंतर्गत कोकण रेल्वेच्या मार्गावर काम करणाऱ्या तिकीट तपासनिसानी उत्कृष्ट कामगिरी करत ७८ हजार ११५ कारवाई करून तब्बल २१ कोटी १७ लाखाचा दंड वसूल करण्यात आला. या सर्व तिकीट तपासनिसांना कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.