पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात डास प्रतिबंधात्मक फवारणी करा..

73
2
Google search engine
Google search engine

मनसे पदाधिकाऱ्यांची आरोग्य अधिकाऱ्यांकडे मागणी…

सावंतवाडी,ता.२०: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात डासांचा फैलाव झाला आहे. त्यासोबतच रोगराई वाढत असल्याचे संकेत देखील पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने याची दखल घेऊन तात्काळ शहरात डास प्रतिबंधात्मक फवारणी करून उघडी गटारे बंद करावीत, अशी मागणी मनसेच्या माध्यमातून आरोग्य अधिकारी रसिका नाडकर्णी यांच्याकडे करण्यात आली.

दरम्यान यावर तात्काळ उपयोजना करण्यात येणार असून डास प्रतिबंधात्मक फवारणी संपूर्ण शहरात प्रभागनिहाय हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुरू असल्याचे सौ. नाडकर्णी यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, शहर उपाध्यक्ष सिद्धेश आकेरकर, मळगाव उपविभाग अध्यक्ष राकेश परब उपस्थित होते.