असनियेत अखेर बस सेवा नियमित सुरू, ग्रामस्थांनी मानले साळगावकरांचे आभार…

150
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता‌.२०: तालुक्यातील असनिये गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून एसटी बस सेवा अनियमित सुरू असल्याने येथील शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत होता. दरम्यान याबाबत येथील ग्रामस्थांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची मदत घेत डेपो मॅनेजर विशाल शेवाळे यांच्याशी चर्चा केली. दरम्यान आज बस सेवा नियमित सुरू झाल्याने ग्रामस्थांनी श्री. साळगावकर यांचे आभार मानले. असनिये गावामध्ये जाणाऱ्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे व रस्त्यावर खोळंबलेल्या झाडांच्या फांद्यांमुळे बस वाहकांना मोठी कसरत करावी लागत असे. त्याबरोबरच बसच्या कांचांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असे. त्यामुळे चार किलोमीटर अगोदरच बस वाहक बस परतून नेत असत, या सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर असनिये ग्रामस्थ व सरपंचांच्या माध्यमातून रस्ता दुरुस्ती करून रस्त्यावर खोळंबलेली झाडे तोडण्यात आली. एसटी प्रशासनाकडून रस्त्याची पाहणी केल्यानंतर आज पुन्हा एसटी सेवा सुरळीत करण्यात आली आहे.