सिंधुदुर्ग आरटीओचे जुलै ते डिसेंबर कालावधीतील कॅम्प जाहीर…

542
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.२०: सिंधुदुर्ग आरटीओच्या माध्यमातून जुलै ते डिसेंबर या कालावधीत घेण्यात येणाऱ्या तालुकास्तरीय कॅम्प चे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार जिल्ह्यातील वाहनधारक व परवानाधारकांना सेवा देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी दिली. देवगड तालुक्यासाठी ३ जुलै, ६ ऑगस्ट , ३ सप्टेंबर, ८ ऑक्टोबर, ६ नोव्हेंबर, ४ डिसेंबर, कणकवली तालुक्यासाठी ४ जुलै, ७ ऑगस्ट, ४ सप्टेंबर, ९ ऑक्टोबर, ७ नोव्हेंबर, ५ डिसेंबर, मालवण तालुक्यासाठी १० जुलै, १३ ऑगस्ट, १० सप्टेंबर, १६ ऑक्टोबर, १३ नोव्हेंबर, ११ डिसेंबर, वेंगुर्ला तालुक्यासाठी ११ जुलै, १४ ऑगस्ट, ११ सप्टेंबर, १७ ऑक्टोबर, १४ नोव्हेंबर, १२ डिसेंबर, सावंतवाडी तालुक्यासाठी १८ जुलै, २१ ऑगस्ट, १८ सप्टेंबर, २३ ऑक्टोबर, २० नोव्हेंबर, १८ डिसेंबर, दोडामार्ग तालुक्यासाठी १९ जुलै, २२ ऑगस्ट, १९ सप्टेंबर, २४ ऑक्टोबर, २१ नोव्हेंबर, १९ डिसेंबर या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे यांनी केले आहे.