सामंत ट्रस्टच्या माध्यमातून ५ गरजूंना आर्थिक मदत…

89
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२०: सामंत ट्रस्ट तर्फे सावंतवाडीतील गरजू ५ रूग्णांना आज आर्थिक मदत सुपुर्द करण्यात आली. त्यांना प्रत्येकी १० हजार रुपयांचे धनादेश माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. आर्थिक परिस्थिती नसलेल्या आणि औषधोपचार न परवडणाऱ्या अनेकांना सामंत ट्रस्ट आधार देईल, असं मत डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केले.

सावंतवाडी येथे सामंत ट्रस्ट तर्फे मदत करण्यात आली. नेमळे, हरिजनवाडी येथील हातावरील शस्त्रक्रिया झालेल्या रमावती नेमळेकर, असनिये येथील ह्रदयरोगाने ग्रस्त वैशाली सावंत, उच्चरक्तदाब आणि सांधेदुखीने त्रस्त केदार कोळपते आणि कानू कोलते, सावंतवाडी येथील सांधेदुखी आजाराने पिडीत राधिका मडकईकर अशा ५ गरजू रुग्णांना हे धनादेश प्रदान करण्यात आले.

यावेळी माजी नगरसेवक डॉ. जयेंद्र परुळेकर, मालवणी कवी दादा मडकईकर, विनायक कांडरकर आदी उपस्थित होते.