छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस येथील कृषीदुत माडखोलात दाखल…

64
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२०: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली मान्यताप्राप्त छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस ओरोस येथे शिक्षण घेत असलेल्या कृषीदुत माडखोल गावात दाखल झाले आहेत. यावेळी मडखोल गावच्या सरपंच, उपसरपंच यांनी कृषीदुतांचे स्वागत केले.

महाविद्यालयाचे प्रा. योगेश पेडणेकर, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रसाद ओगले, प्रा. महेश परुळेकर प्रा. गोपाल गायकी, प्रा. भावना पाताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वेश सावंत, योगेश तेली,आदित्य खताळ, सौरभ टेंगले, समीर कुथे, स्वप्निल गायकवाड कृषीदुत ग्रामीण कृषी कार्यानुभव या शैक्षणिक अभ्यासक्रमाअंतर्गत माडखोल येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेत त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

याप्रसंगी सरपंच सौ. श्रृश्नवी राऊळ, उपसरपंच कृष्णा राऊळ, कृषी सहाय्यिका सौ. सुजाता पाटील, ग्रामसेवक अधिकारी स. के. राऊळ, लिपिक प्रकाश ठाकुर व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

कृषी शिक्षणाच्या माध्यमातून कृषीदुत येथील शेतकऱ्यांच्या सहयोगाने शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करणे, शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, चारा पिके, पारंपारिक नैसर्गिक शेतीचा अभ्यास करणे, वृक्ष लागवड करणे, कृषी विषयक कार्यशाळा घेणे, असे विविध उपक्रम राबवणार आहेत.