कृषी महाविद्यालयच्या कृषीकन्यांचे होडावडा ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत…  

123
2
Google search engine
Google search engine

वेंगुर्ला,ता.२०: छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय किर्लोस येथे शिक्षण घेत असलेल्या कृषीकन्या वेंगुर्ले तालुक्यातील होडावडा गावात दाखल झाल्या. त्यांचे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच सौ. रसिका केळुसकर यांनी स्वागत केले.

यावेळी उपसरपंच राजबा सावंत, ग्रामसेवक रत्नप्रभा टेमकर, लिपीक समीर सावंत तसेच इतर कर्मचारी व ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्रा. योगेश पेडणेकर व कार्यक्रम अधिकारी प्रा. ओगले, प्रा. परुळेकर, प्रा. गायकी यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या

सृष्टी पटेकर, प्रतीक्षा पंडित, हरिता दास, श्री लक्ष्मी के, गौरी पी.आर. या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सेंद्रिय शेती, पारंपारिक नैसर्गिक शेती, शेती तंत्रज्ञानाचा प्रसार, वृक्ष लागवड, बीज प्रक्रिया, कृषी विषयक कार्यशाळा, असे विविध उपक्रम राबवणार आहेत.