दाखले देण्यासाठी माणगाव खोऱ्यातून शिबिराला सुरुवात…

128
2
Google search engine
Google search engine

कुडाळ तहसीलदारांची संकल्पना; अनेक विद्यार्थ्यांनी घेतला लाभ…

कुडाळ,ता.२०: विद्यार्थ्यांना शालेय प्रवेशासाठी दाखले मिळावेत यासाठी कुडाळ तहसीलदार कार्यालयाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या दाखले शिबिराला आज माणगाव पासून सुरुवात करण्यात आली. आगामी काळात तालुक्यात हे शिबिर राबविण्यात येणार आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी केले. माणगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे ग्रामस्थांच्या माध्यमातून कौतुक करण्यात आले.
यावेळी सरपंच मनिषा भोसले, उपसरपंच भिकाजी उर्फ बापू बागवे, माणगांव मंडळ अधिकारी आनंद नार्वेकर, गोठोस मंडळ अधिकारी रजनी ढवळ, माणगांव तलाठी विश्वास शेणवी, वसोली तलाठी अनिल राणे, घावनळे तलाठी मनिषा शिपुगडे, हिर्लोक तलाठी संतोष बांदेकर, वाडोस तलाठी शशिकांत परब, प्रशिक्षणार्थी तलाठी ओमकार केसरकर, सानिका गावकर, तनुजा बिरादार, कोतवाल प्रशांत दळवी, समिर तातावडे, अमित पिंगुळकर, संघटक बबन बोभाटे, रमा ताम्हाणेकर, कृष्णा धुरी आदींसह माणगांव ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.