अल्पवयीन युवतीवर अत्याचार, तरुणास सशर्त जामीन मंजूर…

624
2
Google search engine
Google search engine

कणकवली, ता.२१: इंन्स्ट्राग्रामवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीशी ती अनुसूचित जातीची आहे हे माहित असतानाही तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तुषार सत्यवान परभू (रा. मुटाट-देवगड) याची विशेष न्यायाधिश तथा अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. एस. जोशी यांनी ५० हजाराच्या सशर्त जामीनवर मुक्तता केली. संशयिताच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.
२०२२ मध्ये इंन्स्ट्राग्रामवर ओळख बाढवून, मैत्री करून अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी जबरदस्तीने नेऊन शारिरीक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या आरोपीला उपविभागिय पोलीस अधिकाऱ्यांनी २७ जानेवारीला बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा, अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये अटक केली होती. ३१ जानेवारी २०२४ पासून तो पोलीस कोठडीत होता. दरम्यान, त्याच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या जामिन अर्जावर झालेल्या सुनावणीनंतर अशाप्रकारचा गुन्हा परत करू नये. पिडीत मुलींशी संपर्क साधू नये आदी अटींवर ५० हजार रुपयांचा जामिन मंजूर करण्यात आला.