सावंतवाडीत आजपासून ३ दिवस योग जागरण शिबिर…

56
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२२: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील वैश्यभवन मध्ये आज पासून ३ दिवशीय विनाशुल्क योग जागरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर पतंजली योग समिती, वैश्य समाज व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. योग शिबिराचे उद्घाटन सायंकाळी ५:०० वाजता होणार आहे.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर, डिजिटल मीडियाचे जिल्हाप्रमुख अमोल टेंबकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, माजी राज्य अध्यक्ष गजानन नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. हे ३ दिवसीय शिबिर सावंतवाडी शिवाजी चौक वैश्य भवन येथे सायंकाळी ६ ते ८ या वेळेमध्ये होणार आहे. या शिबिरास योगशिक्षक विकास गोवेकर, दत्तात्रय निखार्गे व विद्याधर पाटणकर हे मार्गदर्शन करणार आहेत.