सिंधुमित्र सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून बंदिवानांसोबत योग दिन साजरा…

98
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२२: सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून येथील जिल्हा कारागृह वर्ग-२ च्या बंदिवानांसोबत आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांनी बंदिवाना योगासनाच्या प्रत्येक प्रात्यक्षिकासह त्याचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी प्रतिष्ठानचे अँड्र्यू फर्नांडिस, सिद्धेश मणेरीकर, तुषार पाबळे, सौरभ दांडगे यांनी कारागृहातील बंदीवाना सर्वसंधी संचालन, ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, भद्रासन, वज्रासन, भुजंगासन, पवनमुक्तासन, प्राणायाम, अनुलोम-विलोम, ओंकार, सूर्यनमस्कार आदी योगप्रकाराबाबत प्रात्यक्षिकासहित मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कारागृह अधीक्षक संदीप एकाशींगे यांनी सिंधुमित्र प्रतिष्ठानच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करीत सिंधुमित्र प्रतिष्ठानचे आभार मानले. या योगा प्रशिक्षणात बंदिवानसह कारागृह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.