सह्याद्री कृषी पर्यटन संस्थेच्या वतीने १ जुलैला वर्षा पर्यटन सहल…

158
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२२: सह्याद्री कृषी पर्यटन सहकारी संस्थेच्या वतीने १ जुलैला “वर्षा कृषी पर्यटन सहली”चे आयोजन करण्यात आले आहे. ही सहल सावंतवाडी ते माडखोल सावंत फार्म, दाणोली साटम महाराज मंदिर, कृषी पर्यटन केंद्र, केसरी मत्स्यालय प्रकल्प, आंबोली धबधबा, आंबोलीतील विविध पॉईंट, कुंभवडे बाबा धबधबा, विजय गावडे कृषी पर्यटन केंद्र, पारगड किल्ला दर्शन करून तळकट अशी काढण्यात येणार आहे. या सहलीत विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होतील, अशी माहिती अध्यक्ष रामानंद शिरोडकर यांनी दिली.

कृषी पर्यटन सहलीमध्ये बँकेचे संचालक, सभासद, संस्थेचे सभासद, कृषी पर्यटन व्यावसायिक सहभागी होणार आहेत. कृषी पर्यटन व्यावसायिक, कृषी पर्यटकांनी या सहलीत सहभागी व्हायचे असेल त्यांनी संचालिका सौ.विभावरी सुकी 8275775972 यांच्याशी संपर्क येत्या २८ जून पर्यंत साधावा, असे आवाहन रामानंद शिरोडकर यांनी केले आहे. या सहलीत प्रति व्यक्तीला १ हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.