व्यायाम, योगा करुन शरीराची काळजी घ्या, आयुष्य दुपटीने वाढेल…

52
2
Google search engine
Google search engine

दिलीप नार्वेकर; सावंतवाडी येथे आयोजित योग शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी,ता.२२: जीवनात व्यायाम आणि योगा नियमीत केल्यास शरीर तंदुरुस्त रहाते शरीराची वेळीच काळजी घेतल्याच आयुष्य दुपटीने वाढते, कोणतेही आजार जवळ येत नाहीत, त्यामुळे युवा पिढीने याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते दिलीप नार्वेकर यांनी आज येथे केले. दरम्यान सावंतवाडी पत्रकार संघ तसेच अन्य संस्थांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेला हा योगा शिबीराचा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. त्याचा फायदा सर्वांनी घेतला पाहीजे असे ही ते म्हणाले.

सावंतवाडी पत्रकार संघ, पतंजली योग समिती आणि वैश्य समाज सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज येथिल वैश्य भवन सभागृहात ३ दिवशीय मोफत योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते उपस्थितांंना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपिठावर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश्चद्र पवार, जेष्ठ पत्रकार अभिमन्यू लाेंंढे, सिंधुदुर्ग डीजीटल मिडीयाचे जिल्हाध्यक्ष अमोल टेंबकर, पंतजंली परिवाराचे महेश भाट, वैश्य समाजाचे अध्यक्ष रमेश बोंद्रे, बाळासाहेब बोर्डेकर, योगप्रशिक्षण विकास गोवेकर, दत्तात्रय निखार्गे भरत गावडे, संतोष सावंत, रुपेश पाटील, उमेश सावंत, रामचंद्र कुडाळकर, नरेंद्र देशपांडे, विनायक गावंस, निखील माळकर, भुवन नाईक आदी उपस्थित होते.

यावेळी श्री. नार्वेकर म्हणाले या ठिकाणी योगाला मोठ्या प्रमाणात महत्व आहे. रोजच्या जीवनात धकधकीने कंटाळलेले अनेक जण आपले शरीर तंदुरूस्त रहावे यासाठी योगा किंवा व्यायाम करताना दिसतात मोठ्या शहरात या योगावर्गात दाखल होण्यासाठी हजारो रुपये आकारले जातात, मात्र या ठिकाणी सामाजिक संस्थांनी एकत्र येवून सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. यावेळी श्री. बोंद्रे म्हणाले आम्ही, सामाजिक क्षेत्रात नेहमीच काम करत असतो मात्र योग दिनाच्या निमित्ताने एखादा उपक्रम समाजासाठी राबवावा जेणेकरून त्याचा फायदा प्रत्येक घटकाला होईल या उद्देशाने हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला, त्याला प्रतिसाद मिळाला ही कौतुकाची गोष्ट आहे. यावेळी श्री. तोरसकर म्हणाले रोजच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या शरीराकडे लक्ष देणे राहून जाते आणि नंतर व्याधी निर्माण झाल्यानंतर अनेक जण डॉक्टरांचा शोध घेतात मात्र नियमित व्यायाम केल्यास जो आजार गोळ्या किंवा औषधे घेवून बरा होत नाही, तो आजार योगा किंवा व्यायामाने बरा होतो. त्यामुळे नियमीत व्यायाम करा असे सांगुन त्यांनी उपक्रमाचे कौतूक केले.