सावंतवाडी तहसील समोरील “तो” धोकादायक प्रवेशद्वार अखेर हटवला…

180
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२३: येथील तहसीलदार कार्यालयाच्या समोर असलेला “तो” धोकादायक लोखंडी प्रवेशद्वार अखेर हटविण्यात आला आहे. “तो” प्रवेशद्वार जीर्ण झाल्यामुळे तात्काळ काढून टाकण्यात यावा, अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी केली होती. त्यानुसार ही कार्यवाही करण्यात आली आहे. गेले अनेक दिवस हा प्रवेशद्वार त्या ठिकाणी उभा होता. त्या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता होती. त्यामुळे तो तात्काळ हटविण्यात यावा व त्या ठिकाणी नव्याने प्रवेशव्दार उभारण्यात द्यावा अशी मागणी श्री. भोकटे यांनी केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. त्याबाबतची माहिती श्री. भोगटे यांनी दिली.