सांगेली येथील आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

135
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२३: येथील घे भरारी फाऊंडेशन यांच्या माध्यमातून सांगेली येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी तब्बल १०० हून अधिक रुग्णांनी या शिबिरात तपासणीचा लाभ घेतला. यावेळी उपस्थित रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले.

यावेळी डाॅ.राजेश गुप्ता, ज्ञानेश्वर दुर्भाटकर, राजेश नवांगुळ, रेवण खटावकर, सतीश सावंत, शेखर कार्लेकर , श्रुती सावंत आदींनी यावेळी तपासणी केली. या सर्वांचे सांगेली गावाच्या वतीने आणि घे भरारी फाउंडेशनच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी मेघना राऊळ यांनी केले तर आभार प्रदर्शन घे भरारी फाउंडेशनच्या संचालिका मोहिनी मडगावकर यांनी केले.

या कार्यक्रमाला घे भरारी फाउंडेशन च्या संस्थापक अध्यक्ष मोहिनी मडगावकर , अध्यक्षा गीता सावंत, उपाध्यक्षा शारदा गुरव , सेक्रेटरी मेघना राऊळ, खजिनदार मेघना साळगावकर, महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र कुडाळ च्या संचालिका सुश्मिता नाईक, रिया रेडीज ,रेखा कुमटेकर , स्वप्नाली कारेकर , वैष्णवी बांदेकर संध्या पवार , सलोनी वंजारी शालेय समिती चे अध्यक्ष सागर सांगेलकर, सांगेली उपसरपंच संतोष नार्वेकर जिल्हा परिषद चे माजी सभापती पंढरीनाथ राऊळ, आनंद राऊळ बचत गटाच्या अध्यक्षा आकांक्षा कीनळोस्कर , आरोग्य सेविका प्रियांका राऊळ आदी उपस्थित होते.