बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या वयोवृद्धाला सामाजिक बांधिलकिची मदत…

362
2
Google search engine
Google search engine

सावंतवाडी,ता.२४: येथील बाहेरचावाडा परिसरात बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला सामाजिक बांधिलकी व सावंतवाडी पोलिसांच्या माध्यमातून सुखरूप घरी पोहोचवण्यात आले. नामदेव तोरस्कर रा. आकेरी असे संबंधित व्यक्तीचे नाव असून काल फिट आल्याने ते बाहेरचावाडा परिसरातील रस्त्याच्या कडेला बेशुद्ध होऊन पडले होते.

दरम्यान नशेत कोणीतरी पडले असावे असा समज झाल्यामुळे नागरिकांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केला. मात्र सायंकाळपर्यंत ते त्या ठिकाणीच बेशुद्ध अवस्थेत असल्याने याची कल्पना इम्तियाज राजगुरू यांनी सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना दिली. श्री. जाधव यांनी संबंधित व्यक्तीवर प्राथमिक उपचार करून त्यांना शुद्धीवर आणले. दरम्यान शुद्धीवर आल्यानंतर आपण आकेरी येथील असून कामानिमित्त या ठिकाणी आलो होतो, अचानक फिट आल्याने मी येथे बेशुद्ध झालो, असे त्यांनी सांगितले. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यात कळविल्यानंतर पोलीस अनिल धुरे व श्री‌. डिसोझा घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान त्यांनी सांगितलेल्या पत्त्यानुसार त्यांना सुखरूप घरी पोहोचवण्यात आले. याबाबत संबंधित वयोवृद्ध व्यक्तीच्या कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी व पोलिसांचे आभार मानले.