बांद्यात पदवीधर महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरेंच्या प्रचाराला सुरूवात…

110
2
Google search engine
Google search engine

बांदा,ता.२४: कोकण पदवीधर मतदासंघाचे महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा बांदा शहरात जोरदार प्रचार सुरू आहे. सर्व प्रभाग निहाय प्रचार यंत्रणा राबविण्यात येत असून महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतिब, युवा कार्यकर्ते सिद्धेश महाजन, गुरुनाथ सावंत, राकेश केसरकर, शैलेश केसरकर, महिला शहर अध्यक्ष स्मिता पेडणेकर आदी उपस्थित होते. यावेळी बांदा शहरातून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार श्वेता कोरगावकर व जावेद खतीब यांनी व्यक्त केला.