केर येथे हत्तींकडून बांबू तोडून‌ रस्त्यावर, काही काळ वाहतूक ठप्प…

195
2
Google search engine
Google search engine

आश्वासने नको, योग्य तो बंदोबस्त करा, ग्रामस्थांची वनविभागाकडे मागणी…

दोडामार्ग,ता.२४: केर गावात स्थिरावलेल्या हत्तींनी आज मोर्ले-केर रस्त्यावर बांबू तोडुन टाकल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान त्या ठिकाणी असलेल्या हत्तींचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून होत आहे. गेले अनेक महीने हत्तींकडुन नुकसान सुरूच आहे. आता हत्ती याच ठिकाणी बारमाही राहत असल्यामुळे नुकसानी कशी वाचवायची? असा प्रश्न ग्रामस्थांसमोर निर्माण झाला आहे. बंगाल येथिल टिम आणून हत्तींना रोखू असे आश्वासन वनविभागाकडुन दिले होते‌. मात्र त्यात अद्याप पर्यंत पुर्तता करण्यात न आल्याने नुकसानी सुरूच आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.