आजच्या स्पर्धेच्या युगात तंत्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे…

121
2
Google search engine
Google search engine

शशि पित्रे; नाबर स्कूल मध्ये एम.एस.ए.टी. विभागात विद्यार्थ्यांचे स्वागत…

बांदा,ता.२४: आजच्या स्पर्धेच्या युगात तंत्रशिक्षण अत्यंत महत्त्वाचे असून शिक्षण करुन नोकरी मिळणे आज खुप कठीण झाले आहे. त्यामुळे शिक्षणानंतर उद्योग सुरू करून उद्योजक बना, असे मत उद्योजक शशि पित्रे यांनी आज येथे व्यक्त केले. व्ही.एन‌.नाबर मेमोरियल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील एम.एस.ए.टी विभागाच्या आठवी मधील विद्यार्थ्यांच्या स्वागत कार्यक्रम मध्ये ते बोलत होते. यावेळी प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई, जेष्ठ निदेशिका सौ. रिया देसाई आदी उपस्थित होते.

श्री.पित्रे पुढे म्हणाले, या प्रशाळेमध्ये एस.एस.ए.टी हा विषय सन २००८ पासून शिकवला जात आहे. या विषयामुळेच या प्रशाळेतील जास्तीत जास्त विद्यार्थी इंजिनिअरिंग कडे गेले आहेत. खरचं हे खूप कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. एम.एस.ए.टी विभागातील चार ही विभागाची सविस्तर माहिती प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ.मनाली देसाई यांनी देत एम.एस.ए. टी. विभागात आलेल्या आठवी मधील विद्यार्थ्यांंचे स्वागत केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आठवी मधील विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन अनोख्या पद्धतीने स्वागत करण्यात आले. यावेळी निदेशक भूषण सावंत, राकेश परब, गायत्री देसाई, इयत्ता आठवी मधील विद्यार्थीं व विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक राकेश परब तर आभार सौ.गायत्री देसाई हिने मानले.