विद्यार्थ्यांनी भवितव्याबाबत विचार करून पुढील शिक्षणाची दिशा निश्चित करा…

60
2
Google search engine
Google search engine

दिवाकर राऊळ; मळगाव इंग्लिश स्कूलच्या दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार…

बांदा,ता.२४: विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता, आवड व भवितव्याबाबत विचार करून आपल्या पुढील शिक्षणाची दिशा निश्चित करावी. यासाठी शिक्षक व पालक यांचे मार्गदर्शन घ्यावे, असे प्रतिपादन माजी मुख्याध्यापक दिवाकर राऊळ यांनी आज येथे केले.
माजी विद्यार्थी परिवार मळगाव इंग्लिश स्कूलने आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. प्रशाळेतून दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यात ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या सिया नाटेकर, पूजा कोळेकर, नीलेश मेस्त्री, सम्रृद्धी गवस, कोमल दुवे या मुलांना शैक्षणिक साहित्य देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व मुख्याध्यापक यांचा मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात व्यासपीठावर माजी विद्यार्थी परिवार मळगाव इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष शेखर पाडगावकर, उपाध्यक्ष प्रभाकर तेली, सचिव महेश गावकर, खजिनदार अर्जुन देवळी, शालेय समितीचे अध्यक्ष मनोहर राऊळ, सदस्य दिवाकर राऊळ, समीर परब, गुरुनाथ नार्वेकर, श्रध्दा सावंत, शरद शिरोडकर, पालक संघाच्या उपाध्यक्षा श्रीमती नाटेकर, मुख्याध्यापक श्री. फाले, पर्यवेक्षक श्री कदम आदी उपस्थित होते.