गुणवंत विद्यार्थी हे राष्‍ट्राची संपत्ती…

46
2
Google search engine
Google search engine

घनश्याम गावकर; घाडीगावकर समाजातील गुणवंतांचा कणकवलीत सत्‍कार…

कणकवली, ता.२४ : गुणवंत विद्यार्थी हे राष्‍ट्राची संपती आहेत. उद्योग, व्यवसाय तसेच विविध क्षेत्रात त्‍यांचे मोलाचे योगदान ठरणार आहे. त्‍यामुळे अशा गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप देऊन त्‍यांचा उत्‍साह वाढवायला हवा असे प्रतिपादन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज, मुंबई संस्थेचे राज्य अध्यक्ष घनश्याम गांवकर यांनी केले.

क्षत्रिय मराठा घाडीगांवकर सेवा समाज मुंबई संस्थेच्या वतीने कणकवलीतील मातोश्री मंगल कार्यालयात घाडीगावकर समाजातील गुणवंतांचा सत्‍कार कार्यक्रम झाला. यावेळी दहावी, बारावी, शिष्यवृत्ती तसेच क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळविलेल्‍या गुणवंताचा मान्यवरांच्याहस्ते सत्‍कार करण्यात आला.

घाडीगांवकर संस्थेचे राज्य कार्यकारणी सदस्य तथा ज्‍येष्‍ठ पत्रकार विजय गावकर यांनी यावेळी नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रातील विविध संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. व्यवसाय अथवा शिक्षणक्रम निवडताना अंधानुकरण करू नये असेही आवाह त्‍यांनी केले.

या कार्यक्रमावेळी घनश्याम गांवकर, लक्ष्मण घाडीगांवकर (उपाध्यक्ष), विजय गांवकर, सूर्यकांत घाडी (अध्यक्ष-सिंधुदुर्ग विभाग), विजय घाडी (उपाध्यक्ष ), प्रदीप घाडी (सचिव), बुधाजी घाडीगांवकर (सहसचिव ), सुनील गांवकर (खजिनदार ), सत्यवान घाडीगांवकर, एस. व्ही. घाडीगांवकर, जिल्‍हा महिला अध्यक्षा प्रीतम घाडीगांवकर, अश्विनी गांवकर, भिसाजी घाडी, सदानंद घाडीगांवकर, चंदन घाडी, संभाजी घाडीगांवकर , कृष्णा घाडीगांवकर, सुभाष गांवकर, जगन्नाथ गांवकर, प्रवीण घाडीगांवकर आदी पदाधिकारी आणि समाजबांधव तसेच गुणवंत विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.